S M L

हिमाचल प्रदेशातल्या अपघातात अजूनही 21 विद्यार्थी बेपत्ता

Samruddha Bhambure | Updated On: Jun 9, 2014 03:22 PM IST

हिमाचल प्रदेशातल्या अपघातात अजूनही 21 विद्यार्थी बेपत्ता

09 जून : हिमाचल प्रदेशात धरण्याच्या पाण्यात वाहून गेलेल्यांचा शोध अजूनही सुरू आहे. काल झालेल्या अपघातामध्ये हैदराबादमधल्या 24 विद्यार्थ्यांसह, एक शिक्षक आणि टूर गाईड असे 26 जण वाहून गेले होते. आतापर्यंत 5 मृतदेह हाती लागलेत. उरलेल्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी आणि हिमाचलचे मुख्यमंत्री विरभद्र सिंह घटनास्थळी आहेत. संपूर्ण प्रकरणाचा तपास झाल्यानंतर दोषी कोण हे ठरवता येईल. इथल्या समस्यांबाबत संबंधितांना माहिती दिली असून अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा घडू नये अशी आशा असल्याची प्रतिक्रिया स्मृती इराणी यांनी व्यक्त केली.

बचावकार्याची पहाणी करण्यासाठी काही वेळात हवाई वाहतूक मंत्रीही दाखल होणार आहेत. आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी वाहून गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. बियास नदीवरच्या लारजी धरणातून पूर्वसूचनेशिवाय पाणी सोडण्यात आलं होतं. या धरणाच्या नदीकाठी फोटो काढत असलेले हैदराबादच्या इंजीनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी वाहून गेलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 9, 2014 03:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close