S M L

अब्बास काझमी कसाबचे वकील

16 एप्रिल मुंबई26/11 च्या मुंबई हल्ल्यातला एकमेव जिवंत आरोपी कसाब याचे वकील म्हणून अब्बास काझमी यांची निवड करण्यात आली आहे. ऍड. अंजली वाघमारे यांच्याकडून कसाबची केस काढून घेतल्यानंतर आपल्याला पाकिस्तानी वकील हवाय, अशी मागणी पुन्हा एकदा काल कसाबनं केली होती. त्याच्या या मागणीवर आर्थररोड सेशन कोर्टानं अब्बास काजमी यांची नियुक्ती केली. मात्र अब्बास काझमी हे पाकिस्तानी वकील नाहीत. काझमी यांचे सहाय्यक म्हणून ऍड. के.पी. पवार यांना काम पाहण्याचे आदेश दिले आहेत. अब्बास काझमी हे बार कौन्सिलच्या लिगल एड पॅनेलवर नाहीत. ते खाजगी वकील असून ते सेशन बार कौन्सिलचे सदस्य आहेत. एकाच वेळी साक्षीदार आणि आरोपी असं दोघांचं वकीलपत्र घेणं म्हणजे वकिली आचारसंहितेचं उल्लंघन करणं आहे. याचाच परिणाम कसाबची केस लढवणा-या वकील ऍड. अंजली वाघमारे यांच्यावर झाला. त्यामुळे त्यांच्याकडून कसाबचं वकीलपत्र काढून घेतलं. त्यावेळी कसाबनं पुन्हा एकदा त्याला स्वत:ला पाकिस्तानी वकील हवाय, अशी मागणी काल बुधवारी केली होती. पण त्यासंदर्भात पाकिस्तान सरकारला पत्र पाठवलेलं असून त्या पत्राला अजून उत्तर आलं नसल्याची बाब सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काल कोर्ट संपल्यावरच्या पत्रकार परिषदेत सांगितली होती. आज 26/11 च्या सुनावणीच्या दुस-या दिवशी कसाबचे वकील म्हण्‌ून आर्थररोड सेशन कोर्टानं अब्बास काझमी यांची नियुक्ती केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 16, 2009 10:03 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2009 10:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close