S M L

पाकच्या कुरापत्या सुरूच, सीमारेषेवर गोळीबार 1 जवान शहीद

Sachin Salve | Updated On: Jun 13, 2014 02:25 PM IST

loc pak13 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी हजेरी लावली होती. या घटनेला दोन आठवडे पूर्ण होत नाही तेच सीमारेषेवर पाकने कुरापत्या करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन झालंय.

जम्मू काश्मीरच्या पूँछमध्ये मेंढर सेक्टरमध्ये आज (शुक्रवारी) सकाळी सातच्या सुमारास पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. मेंढर सेक्टरमधील तारकुंडी, बालाकोट, कांगा गली, सवाल ग आणि बवाल फॉरवर्ड या भागात पाकने गोळीबार केला.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी मेंढर सेक्टरमध्ये पाकने ग्रेनेड आणि लहान तोफांनी हल्ला केला.

यात एक जवान शहीद झालाय तर 3 जण जखमी आहेत. त्याला भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिलंय. दुपारी दोन्हींकडून गोळीबार थांबलेला आहे. जम्मू काश्मिरमधल्या या गोळीबारावर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केलंय. राजौरी आणि पूँछमध्ये गोळीबार झालाय. यात शस्त्रसंधीचं उल्लंघन झालंय. या भागातल्या वस्त्यांवरही हा हल्ला झालाय. यात काही गाई-म्हशीही मृत्यूमुखी पडल्या आहेत अशी माहिती अब्दुल्ला यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 13, 2014 02:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close