S M L

अखेर गोव्याच्या आमदारांची ब्राझील 'वारी' रद्द

Sachin Salve | Updated On: Jun 13, 2014 10:51 PM IST

अखेर गोव्याच्या आमदारांची ब्राझील 'वारी' रद्द

13 जून : फुटबॉलची पंढरी ब्राझीलमध्ये फिफा वर्ल्ड कपला सुरुवात झालीय. जगभरातून लाखो फुटबॉलप्रेमी या पंढरीत दाखल झाले आहेत. गोव्याच्या काही आमदारांनाही फुटबॉलचे सामने पाहण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे गोव्याच्या काही आमदारांनी बॅगा पॅक करून ब्राझीलला निघाले खरे पण सरकारी खर्चावर ब्राझील वारी करत असल्याचं समोर आल्यामुळे अखेर रद्द करण्यात आली आहे.

गोव्याचे आमदार फिफा वर्ल्डकपसाठी स्वखर्चाने ब्राझीलला जाणार आहेत असा दावा गोवा सरकारने केला होता पण आता दौराच रद्द केला आहे गोव्याच्या क्रीडा मंत्र्यांसह सहा आमदार ब्राझीलमध्ये होणार्‍या फिफा वर्ल्ड कपला जाणार होते. ब्राझीलनं एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची तयारी कशी केलीय याचा अभ्यास करण्यासाठीच्या दौर्‍याच्या नावाखाली आमदार सरकारी खर्चाने जाणार होते.

विशेष म्हणजे या आमदारांसोबत एकही क्रीडा तज्ज्ञ किंवा गोव्याच्या क्रीडा विभागाचा एकही अधिकारी जात नाहीय विरोधकांनी टीका केल्यावर मुख्यमंत्री पर्रीकरांनी यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 13, 2014 05:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close