S M L

एक रँक एक पेन्शन योजना राबवणार -मोदी

Sachin Salve | Updated On: Jun 14, 2014 05:37 PM IST

एक रँक एक पेन्शन योजना राबवणार -मोदी

14 जून : देशात युद्ध स्मारक उभारण्याची आणि एक रँक एक पेन्शनची महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलीय. गोव्यात नौदल अधिकार्‍यांसमोर ते बोलत होते. पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच लष्करी तळाला भेट दिली. देशातल्या सर्वात मोठी युद्धनौका विक्रमादित्यचं त्यांनी लोकार्पण केलं. विक्रमादित्य आता देशाच्या सेवेसाठी रुजू झालीय.

यावेळी मोदींनी जवानांनी संवाद साधला. बदलत्या काळानुसार नौसेनेचं महत्व अधिक वाढलंय. आपली मारक क्षमता जास्त असली पाहिजे जेणे करुन जगातील कोणताही देश आपल्याकडे पाहू शकणार नाही. आपण कुणाच्याही वाटेला जाणार नाही अशी आपली भूमिका आहे पण जर कुणी डोळे वटारले तर त्याच्या डोळ्यात डोळे दाखवून बोलण्याची हिंमत आपण ठेवली पाहिजे असंही मोदी म्हणाले. मोदींनी विक्रामादित्य युद्धनौकेची पाहणी केली. यावेळी मोदींनी मिग 29 मध्ये बसून माहितीही जाणून घेतली.

मोदींचा आज गोवा दौरा असल्यामुळे राजधानी पणजीत कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नौदलाच्या वास्को येथील आयएनएस या तळावर किनाराधिष्ठित चाचणी सेवेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय. आज विक्रमादित्यची मोदींनी पाहणीही केली. गोव्यातील मांडवी नदीवर सुमारे चारशे कोटी रुपये खर्चून साडेचार किलोमीटर लांबीचा तिसरा पूल बांधला जाणार आहे. एल ऍण्ड टी कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. या पुलाच्या पायाभरणीच्या नामफलकाचे उद्घाटन आज संध्याकाळी मोदींच्या हस्ते होणार आहे. यानंतर पणजी-दोनापावला येथील स्टेडियममध्ये होणार्‍या एका कार्यक्रमात मोदी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. रात्री मिरामार येथील मेरियट हॉटेलमध्ये राज्यातील सुमारे दीडशे बुध्दीजीवी व्यक्तींसमोर पंतप्रधान आपले विचार मांडणार आहेत.

कशी आहे विक्रमादित्य ?

  • - INS विक्रमादित्य आशिया खंडातील सगळ्यात मोठी विमानवाहू युद्धनौका
  • - 284 मीटर लांबी , 20 मजली उंच
  • - तीन फुटबॉलची मैदान मावतील एवढी मोठी युद्धनौका
  • - 30 मिग 29 ही लढाऊ विमान तैनात
  • - 44 हजार 500 टन वजन
  • - 15 हजार कोटी रुपयांना रशियाकडुन विकत घेतली
  • - भारतीय नौदलाकडे 2 विमानवाहु युद्धनौका, INS विक्रमादित्य INS विराट
  • - दोन विमानवाहु युद्धनौका असलेला भारत हा जगातला तिसरा देश

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 14, 2014 02:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close