S M L

निवडणुकांच्या हंगामात रोजगाराची संधी

17 एप्रिल शिल्पा गाड निवडणूक संधी असते, आपला राजकीय उमेदवार निवडण्याची. पण यावेळेच्या निवडणुकांनी ही संधी जनतेला देताच बेरोजगारांसाठी रोजगाराची संधी चालून आली आहे. जगभरातल्या मंदीच्या वातावरणामुळे देशातही गेल्या काही महिन्यांपासून अनेकांनी आपल्या नोकर्‍या गमावल्या. पण या बेरोजगारांना निवडणुकांमुळे रोजगाराची संधी मिळाल्यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला आहे. निवडणुकांच्या वातावरणात प्रत्येक राजकीय पक्षांची मुख्य गरज असते आपल्या पक्षाच्या प्रचाराची. पक्षांच्या या घोषणाबाजीच्या गरजेमुळे अनेक तरुणांना नोकरी मिळाली आहे. निवडणुकीमुळे लाभलेली अशीच एक तरुणी शिल्पा माधव काही महिन्यांपूर्वी ट्रॅव्हल गुरुमधली अपली नोकरी मंदीच्या गर्तेत गमावून बसल्यामुळे हताश होती. पण या निवडणुकांमध्ये सध्या ती भाजपच्या वेबसाईटसाठी काम करतेय. 'मी इथे ब्लॉग अपडेट करते, मेल पाठवते.' असं तिने सांगितलं. शिल्पासारखे अनेकजण आज वेगवेगळ्या पक्षांच्या वेबसाईटचं काम करताहेत. 8 ते 10 हजारादरम्यानचा पगार त्यांना मंदीच्या काळातही मिळतो. सर्व राजकीय पक्ष वेबसाईट्सना महत्त्व देण्याचं कारण आहे सध्या तरुणांमध्ये निवडणुकांमुळे वाढणारा इंटरेस्ट. लोकसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक तरुण मतदान करणार आहेत. 2004 च्या निवडणुकांपोक्षा यंदाच्या निवडणुकांमध्ये तरूणांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता वेबसाईटसारख्या टेक्नोसॅवी माध्यमाचा वापर करण्याचं ठरवलं. मागणी तसा पुरवठा हे आमचं तत्त्व आहे त्याला अनुसरुनच आम्ही ही योजना राबवल्याचं एनसीपीचे सरचिटणीस प्रकाश बिनसाळे यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 17, 2009 01:10 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 17, 2009 01:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close