S M L

मंत्र्यांच्या परदेश दौर्‍यासाठी जनतेचे 19 कोटी चुराडा !

Sachin Salve | Updated On: Jun 17, 2014 10:31 PM IST

मंत्र्यांच्या परदेश दौर्‍यासाठी जनतेचे 19 कोटी चुराडा !

17 जून : गोव्याच्या आमदारांची ब्राझील वारी हुकली असली तरी गोव्याच्या मंत्र्यांनी त्यांच्याही पुढे पाऊल टाकले आहे. गोव्याचे मंत्र्यांनी जनतेच्या पैशांवर परदेश दौरे केल्याचं उघड झालंय. जनतेचे तब्बल 19 कोटी रुपये या मंत्रीमहोदयांनी चुराडा केले आहेत. हे मंत्री जनतेच्या पैशावर नियमीतपणे परदेश दौरे करत असल्याचं कॅगच्या अहवालात म्हटलंय.

 

अनेक मंत्र्यांनी जगभर असे दौरे केले आहेत आणि त्याचा अमाप खर्च राज्य सरकारकडून वसूल करण्यात आला. कॅग अहवालानुसार 2007 ते 2012 या पाच वर्षांच्या काळात गोव्याच्या पर्यटन खात्याने परदेशात 38 व्यापारी परिषदा 15 रोडशो केले. यावर एकूण खर्च 19 कोटी रुपये झाला. विशेष म्हणजे या संपूर्ण दौर्‍यांमध्ये एकही MOU करण्यात आला नाही.

 

अलीकडे गोव्याचे आमदार ब्राझीलमध्ये फिफा फुटबॉल कप पाहण्यासाठी निघाले होते पण त्यांचा हा दौरा जनतेच्या पैशावर होत असल्याची टीका झाल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला होता आता मंत्रीमहोदयच जनतेच्या पैशावर परदेश दौरे केले असल्याची बाब समोर आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 17, 2014 10:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close