S M L

लोकशाहीर आण्णा भाऊ साठे भारतीयच : महानगरपालिकेला आली जाग

18 एप्रिल गोविंद तुपे लोकशाहीर आण्णा भाऊ साठे कोणत्या देशाचे नागरिक आहेत, असा सवाल काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेनं उपस्थित केला होता. पण आता महानगरपालिकेच्या आधिकार्‍यांना जाग आली असून त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात डफाच्या तालावर आख्खा महाराष्ट्र पिंजून काढणार्‍या आणि गिरणी कामगारंचा प्रश्न आपल्या लेखणीतून मांडणार्‍या लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांना अखेर 42 वर्षानंतर भारतीय नागरिकत्त्वाचं प्रमाणपत्र दिलं आहे.'वार्‍याच्या पाटीवर थंडी बसली होती, घराच्या दाराला धडक्या देऊन म्हणत होती, मला आत घे. कौलाच्या सान्यातून धूर वर निघत होता म्हणजेच चुलीवर काहीतरी शिजतं आहे',असं जीवनाचं वास्तव लोकांसमोर मांडणार्‍या लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याबद्दल काही आठवणी त्यांचे भाचे शहाजी थोरात यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना सांगितल्या.गेल्या कित्येक दिवस याच लोकशाहीरांचं नागरिकत्व भारतीय असल्याचा पुरावा शोधण्यासाठी धडपडताना गेल्याचं सांगून त्यांचे भाचे शहाजी थोरात यांनी महापालिकेच्या दरबारी मात्र त्यांच्या नागरिकत्वाची नोंद नव्हती, असं स्पष्ट केलं. 'तो दाखला मी 12 ऑगस्ट 2005 ला ज्यावेळी काढला तेव्हा त्यामध्ये स्पष्ट लिहलेलं होतं ते भारतीय नाहीत, जर असं असेल तर लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या नावानं महामंडळ का सुरू करण्यात आलं? त्यांनी मराठीत लिहलेलं साहित्य हे काय परदेशात बसून लिहलं?, असे सवाल करत शहाजी थोरात यांनी या सर्व गोष्टींचा पाठपुरावा केला.'माझी मैना गावाकडं राहिली माझ्या जिवाची होतीया काहिली' असं मुंबईचं खडतर जीवन काव्यपंक्तीत शब्दबद्ध करणारे, 'फकिरा', 'चिरागनगरची भुतं', 'गजाआड', 'संघर्ष' यांसारखी मानवी जीवनाचं वास्तव चित्रण करणारी पुस्तकं लिहणारे हे साहित्यिक भारतीय नागरिकत्वासाठी मात्र इतके दिवस उपेक्षितच राहिले याची खंत व्यक्त करण्यात येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 18, 2009 12:14 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 18, 2009 12:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close