S M L

राज्यपालांपाठोपाठ NDMA च्या सदस्यांवर राजीनाम्याची 'आपत्ती'

Sachin Salve | Updated On: Jun 19, 2014 07:35 PM IST

राज्यपालांपाठोपाठ NDMA च्या सदस्यांवर राजीनाम्याची 'आपत्ती'

19 जून : मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून प्रशासनाच्या अनेक पदांवर नव्या नेमणुका होताना दिसत आहेत. आधी यूपीए सरकारच्या काळात नियुक्त्या झालेल्या राज्यपालांना बदलण्याचे आदेश काढण्यात आले. तर आता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजेच एनडीएमए (NDMA)च्या सर्व सदस्यांना राजीनामे द्यायला सांगण्यात आलंय.

एनडीएमएमध्ये अध्यक्षांसह एकूण आठ सदस्य आहेत. या सर्वांना कालच केंद्रीय गृहसचिवांनी फोन करून राजीनामा देण्याची सूचना केलीय. पण, आपण केंद्राला पत्र लिहून आपली भूमिका कळवू. तरीही सरकारने आग्रह धरला तर राजीनामा देऊ, अशी माहिती एनडीएमएच्या सूत्रांकडून कळतेय. एनडीएमए सदस्याला राज्यमंत्री पदाचा दर्जा असतो.

इशरत जहाँ प्रकरणाचा तपास करणारे आणि सीबीआयचे विशेष संचालक म्हणून ज्यांनी काम बघितलं, त्या के. सलीम यांची नुकतीच एनडीएमए सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती. दरम्यान, सरकारने आज महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याचीही मागणी केली तसंच अनुसुचित जाती जमाती आयोगकडून ही मागणी करण्यात आल्याचं समजतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 19, 2014 07:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close