S M L

30 ते 45 हजार शिक्षकांना घरी बसण्याची वेळ?

Sachin Salve | Updated On: Jun 20, 2014 05:48 PM IST

30 ते 45 हजार शिक्षकांना घरी बसण्याची वेळ?

20 जून : मोदी सरकारने कामाचा सपाटा लावलाय पण त्यांच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. पटसंख्येचा निकष आणि नव्या स्टाफिंग पद्धतीमुळे हजारो शिक्षक अतिरिक्त ठरले जाण्याची भीती निर्माण झालीय. शिक्षण हक्क कायद्यातल्या या काही तरतुदींचा जबर फटका सुमारे 30 ते 45 हजार शिक्षकांना घरी बसण्याची शक्यता आहे.

या शिक्षकांना सामावून घेण्याची जागाच नसल्याने त्यांच्या नोकरीवरच गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यात मुंबईतल्या दीड हजार शिक्षकांचा समावेश आहे. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची पगारबिलं काढू नका, असे तोंडी आदेश शिक्षणाधिकार्‍यांनी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत. त्यामुळे शिक्षकामंध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान, या जाचक तरतुदींविरोधात राज्यभर आंदोलन करण्याचा पवित्र शिक्षक भारतीनं घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 20, 2014 02:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close