S M L

साईबाबा देव नाहीतच !, शंकराचार्यांचं वादग्रस्त विधान

Sachin Salve | Updated On: Jun 23, 2014 02:00 PM IST

साईबाबा देव नाहीतच !, शंकराचार्यांचं वादग्रस्त विधान

shankaracharya_23 जून : शिर्डीचे साईबाबा हे देव नाहीतच, त्यामुळे त्यांच्या नावे देऊळ बांधणं चुकीचं आहे असं विधान करुन द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.

साईबाबांच्या नावावर बक्कळ पैसा कमावला जातोय. शिर्डी संस्थानची कमाई तर कोट्यवधीच्या घरात आहे, त्याचबरोबर साईबाबांच्या नावे बांधलेली मंदिरंही लाखो रुपये देणग्यातून कमावतात अशी मुक्ताफळं शंकराचार्यांनी उधळली.

मात्र त्यांच्या केलेलं हे विधान साईभक्तांच्या भावना दुखावू शकता. साईबाबा हे 'हिंदू- मुस्लीम' एकतेचंही प्रतिक मानले जातात, त्यांचे भक्तगण या टिप्पणीनं दुखावले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हे शंकराचार्य यापूर्वी वादग्रस्त वागण्यानं चर्चेत आले होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंत्रकारांनी 'मोदी की केजरीवाल, कोण योग्य उमेदवार?' असा प्रश्न विचारला होता, त्यावेळी स्वरुपानंदांनी एका पत्रकाराच्या श्रीमुखात लगावली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 23, 2014 01:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close