S M L

पुन्हा तोंड कडू, साखर 2 ते 3 रुपयांनी महागणार ?

Sachin Salve | Updated On: Jun 23, 2014 07:49 PM IST

पुन्हा तोंड कडू, साखर 2 ते 3 रुपयांनी महागणार ?

sugar price hike23 जून : महागाईच्या आगीत होरपळणार्‍या सर्वसामान्य जनता रेल्वे भाडेवाढीच्या धक्क्यातून अजून सावरली नाही तेच मोदी सरकारने आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. सरकारने साखरेवरचा आयात कर 15 टक्क्यांवरून 40 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.

त्यामुळे सर्वसामान्यांना साखर वाढीव दरानं मिळण्याची शक्यता आहे. घाऊक बाजारात साखर 2 ते 3 रुपये किलोने महागण्याची शक्यता आहे. ऊस उत्पादक शेतकरी आधीच अनेक अडचणींचा सामना करत आहेत.

त्यांना प्रोत्साहित करण्यासाठीच हा निर्णय घेतल्याचं समजतंय. तसंच साखर कारखान्यांना 4 हजार 400 कोटींपर्यंत अतिरिक्त व्याजमुक्त कर्ज मिळेल, असं अन्न मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 23, 2014 07:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close