S M L

रेल्वे भाडेवाढ कमी करण्याचं महायुतीच्या नेत्यांना आश्वासन

Sachin Salve | Updated On: Jun 24, 2014 01:11 PM IST

रेल्वे भाडेवाढ कमी करण्याचं महायुतीच्या नेत्यांना आश्वासन

mahayuti_mla_meet24 जून : रेल्वेची भाडेवाढ कमी करण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करेल असं आश्वासन रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी दिलंय. मुंबईतील लोकल ट्रेनच्या पासचे दरही कमी करण्याबाबत विचार करू असं गौडांनी महायुतीच्या शिष्टमंडळाला आवाहन दिलंय. रेल्वे भाडेवाढ कमी करण्यात यावी या मागणीसाठी महायुतीच्या मुंबई आणि ठाण्यातील खासदारांच्या शिष्टमंडाळाने दिल्लीत गौडांची भेट घेतली.

त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी हे आश्वासन दिलं. आगामी रेल्वे बजेटमध्ये दर कमी करण्याबाबत घोषणा होऊ शकते असं आम्हाला रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं, असं महायुतीच्या नेत्यांनी सांगितलं. सकाळी साडे नऊ वाजता ही बैठक सुरू झाली आणि पाऊणे अकराच्या सुमाराला संपली.

या बैठकीला महायुतीचे नवनिर्वाचित खासदार गजानन किर्तीकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, खासदार किरीट सोमय्या, राहुल शेवाळे हे हजर होते. रेल्वेच्या भाड्यात 14.2 टक्क्यांने वाढ करण्यात आली. त्यामुळे मुंबईकरांच्या लाईफ लाईन असलेल्या लोकलचे पास दुपट्टीने महाग झाले या दरवाढीच्या विरोधात महायुतीच्या नेत्यांनी दिल्ली गाठली पण रेल्वेमंत्र्यांनी असं कोणतंही ठोस आश्वासन मात्र दिलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 24, 2014 12:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close