S M L

पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा अखेर राजीनामा

Sachin Salve | Updated On: Jun 30, 2014 05:08 PM IST

पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा अखेर राजीनामा

west bengal governor m k narayanan30   जून :  मोदी सरकारच्या आदेशानुसार राज्यपालांच्या राजीनामा सत्र सुरूच आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल एम के नारायणन यांनी राजीनामा दिला आहे. ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा प्रकरणी प्रत्यक्षदर्शी म्हणून त्यांची सीबीआयने चौकशी गेल्या आठवड्यात चौकशी केली.

सत्ताबदलानंतर राजीनाम्याचा त्यांच्यावर दबावही होता. यूपीएच्या काळात नेमणूक करण्यात आलेल्या राज्यपालांनी राजीनामा द्यायला सुरुवात केल्यावर त्यांनीही राजीनामा दिलाय. ऑगस्टा वेस्टलँडच्या चॉपर व्यवहाराच्या वेळी नारायणन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम करत होते.

व्हीव्हीआयपींच्या चॉपर्सच्या तांत्रिक बाबींमध्ये बदल करण्यासंदर्भात जी बैठक झाली ती नारायणन यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. या बैठकीनंतर ऑगस्टा कंपनी या चॉपरच्या व्यवहारासाठी पात्र  झाली.

त्यामुळे हे बदल घडवण्यामागे नेमकी कोणती कारणं होती यासंदर्भात सीबीआयला अधिक माहिती हवी आहे. या व्यवहारात 360 कोटींची लाच दिली गेल्याचा आरोप झालाय. हा व्यवहार गेल्या वर्षी सरकारकडून रद्द करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 30, 2014 05:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close