S M L

सरन्यायाधीश मोदी सरकारवर बरसले

Sachin Salve | Updated On: Jul 1, 2014 10:58 PM IST

सरन्यायाधीश मोदी सरकारवर बरसले

01 जुलै : सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांनी आज (सोमवारी) केंद्र सरकारला चांगलंच फटकारलंय. सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती यांच्या नेमणुकीमध्ये ज्येष्ठ वकील गोपाल सुब्रमण्यम यांची फाईल केंद्रानं परस्पर वेगळी काढली. त्यासाठी सरन्यायाधीशांशी सल्लामसलतही केली नाही, असं लोढा यांनी स्पष्ट केलं.

सुब्रमण्यम यांची फाईल वेगळी काढली, हे ऐकून धक्काच बसला, ही बातमी उघड केल्यामुळे सरन्यायाधीशांनी सुब्रमण्यम यांच्यावरही नाराजी व्यक्त केली. न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याशी कधीही तडजोड केली जाणार नाही, असंही सरन्यायाधीशांनी सुनावले. न्यायाधीश बी. एस चव्हाण यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात सरन्यायाधीशांनी हे मत व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 1, 2014 10:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close