S M L

शंकराचार्यांविरोधात FIR दाखल करा, हायकोर्टात याचिका

Sachin Salve | Updated On: Jul 3, 2014 10:47 PM IST

shankaracharya_03 जुलै : साईबाबा देवच नाहीत, असं वक्तव्य करुन शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी एकच खळबळ उडून दिली याचे पडसाद देशभरात उमटत आहे. देशभरातल्या साईभक्तांनी शंकराचार्यांविरोधात आवाज उठवला आणि आता नागा साधु शंकराचार्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. पण हा वाद आता कोर्टात गेलाय.

शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती आणि साईभक्तांमधला वाद आता आणखी पेटला. हिंदू धर्मियांनी साईबाबांना देव मानू नये, या आपल्या भूमिकेवर शंकराचार्य ठाम आहेत. साईबाबा मांसाहार करायचे, अल्लाची पूजा करायचे त्यामुळे साईबाबांना हिंदूंनी देव मानू नये असं शंकराचार्य म्हणतात.

हिंदूंची श्रद्धा जपण्यासाठी नागा साधूंनी धामिर्क युद्ध पुकारावं, असं आवाहनही शंकराचार्यांनी केलंय. या धामिर्क युद्धाला राजकीय रंग आहे. कारण शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती हे काँग्रेसच्या जवळचे मानले जातात.

केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती या साईबाबांच्या भक्त आहेत. त्यामुळे शंकराचार्यांनी त्यांना लक्ष्य केलंय, असं बोललं जातंय. आता हे प्रकरण कोर्टात गेलंय. शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी याचिका हायकोर्टात दाखल झालीय. जयपूर कोर्टातही अशा प्रकारची याचिका दाखल झाली आहे. हा वाद आता चिघळण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे यावर केंद्र सरकार काय भूमिका घेतं हेही बघावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 3, 2014 10:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close