S M L

पंतप्रधान मोदींनी दाखवला उधमपूर-कटरा रेल्वेला हिरवा झेंडा

Samruddha Bhambure | Updated On: Jul 4, 2014 04:03 PM IST

पंतप्रधान मोदींनी दाखवला उधमपूर-कटरा रेल्वेला हिरवा झेंडा

Modi katra new

04  जुलै :  वैष्णोदेवीच्या दर्शनाला जणार्‍या भाविकांसाठी एक खुशखबर, आता वैष्णोदेवीचा पायथा असणार्‍या कटारपर्यंत थेट रेल्वेने पोहोचता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मादी यांनी आज सकाळी 10.15च्या सुमारास कटार रेल्वे स्टेशनवर कटरा - उधमपूर - नवी दिल्ली रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडाही उपस्थित होते. तसेचं जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमार अब्दुल्लाही उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संपूर्ण दिवस काश्मीरच्या दौर्‍यावर आहेत. मोदींच्या सुरक्षेसाठी श्रीनगरमध्ये SPGचे 100 जवान, तर केंद्रीय सुरक्षा बलाच्या 20 तुकड्या तैनात करण्यात आल्यात. या दौर्‍यादरम्यान काश्मीरचा विकास आणि सुरक्षा हे दोन मुद्दे मोदींच्या अजेंड्यावर आहेत. श्रीनगरमध्ये विशेष सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी श्रीनगरमध्ये लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठकही बोलावली आहे. काश्मीरमध्ये विजेच्या तुटवड्याचा प्रश्न गंभीर असून त्याबाबतही मोदी आज काही सूचना करतील, अशी सूत्रांची माहिती आहे.

दरम्यान, मोदींच्या काश्मीर दौर्‍याआधी धार्मिक नेत्यांनी काश्मीर पंडितांच्या पुनर्वसनाच्या मुद्द्यावरून केंद्रावर टीका केलीय. एनडीए सरकारची योजना षड्‌यंत्र असल्याचं मुफ्तींच्या प्रमुखाने म्हटलंय. त्यांनी काश्मीरमध्ये आंदोलन पुकारण्याचा इशाराही दिलाय. काश्मिरी पंडितांनी काश्मीरमध्ये परतावं यासाठी राज्याने सादर केलेला प्रस्ताव केंद्राच्या विचाराधीन आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दिवसक्रम

11:00- श्रीनगरकडे प्रस्थान. श्रीनगरमध्ये विशेष सुरक्षा आढावा बेठक घेणार. बैठकीसाठी लष्कर, पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी राहणार उपस्थित. श्रीनगरमध्ये बादामी बाग या लष्कराच्या 15 कॉर्प्सच्या मुख्यालयात होणार बैठक. नंतर उरीकडे प्रस्थान

4:00- बारामुल्ला जिल्ह्यात 240 मेगावॅट जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन

5:45- श्रीनगर टेक्निकल एअरपोर्टवरून नवी दिल्लीकडे प्रस्थान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 4, 2014 11:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close