S M L

उधमपूर - कटरा रेल्वेला श्रीशक्ती एक्स्प्रेस नाव द्या - पंतप्रधान

Samruddha Bhambure | Updated On: Jul 4, 2014 05:05 PM IST

उधमपूर - कटरा रेल्वेला श्रीशक्ती एक्स्प्रेस नाव द्या - पंतप्रधान

04  जुलै : वैष्णोदेवीच्या दर्शनाला येणार्‍या भाविकांसाठी शुभेच्छा देत नरेंद्र मोदी यांनी उधमपूर-कटरा रेल्वेचं उद्घाटन केलं. ही केवळ जम्मू-काश्मीरवासीयांसाठी नव्हे तर संपूर्ण भारतवासीयांना ही भेट असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर आजचा दिवस नवी गती आणि नवी ऊर्जा देणारा असल्याचंही ते म्हणाले. आज सकाळी 10.15च्या सुमारास हा उद्घाटन सोहळा पार पडला. दिल्ली ते उधमपूर या मार्गाचा विस्तार करून तो आता कटरापर्यंत नेण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांची आता चांगली सोय झाली आहे. या नव्या एक्स्प्रेसचं नाव 'श्रीशक्ती एक्स्प्रेस' असावं नरेंद्र मोदींनी सुचवलं.

ही केवळ एक रेल्वे नाही तर विकासाची जननी असल्याचं उद्घाटना सोहळ्यानंतरच्या भाषणात नरेंद्र मोदी म्हणाले. ही सेवा सुरू करण्याचा आम्हाला अभिमान असून आता कटरा-बनिहाल रेल्वेसेवेसाठीचे प्रयत्न करणार आहे. जम्मूच्या विकासात कोणताही अडथळा येणार नाही असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.

जम्मू-काश्मीर सुखी व्हावे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. जम्मू-काश्मीरला रेल्वेने जोडण्याचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं स्वप्न आम्ही पुढे नेत आहोत. या नव्या एक्स्प्रेसचं नाव 'श्रीशक्ती एक्स्प्रेस' असावं असंही नरेंद्र मोदींनी सुचवलं. देशातील महत्त्वपूर्ण रेल्वे स्टेशन्स एअरपोर्टइतकीच आधुनिक बनण्यासाठी प्रयत्न करणार असं आश्वासनही मोदींनी दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 4, 2014 12:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close