S M L

महागाईचा भडका, सिलेंडर 250 रुपयांनी महागणार ?

Sachin Salve | Updated On: Jul 4, 2014 09:38 PM IST

cylinder price hike04 जुलै : 'अच्छे दिन आनेवाले हैं' असं स्वप्न दाखवणार्‍या मोदी सरकारने मात्र जनतेला आणखी 'बुरे दिन' दाखवण्याचा चंगच बांधलाय. आता स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर आणि केरोसीनचे भाव वाढवण्याची सरकार तयारी करत आहे. सिलेंडर तब्बल 250 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे तर केरोसीनचे दर लिटरमागे 4 ते 5 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे.

याबाबत पारीख समितीने दिलेल्या शिफारशींचा पेट्रोलियम मंत्रालय विचार करण्याची शक्यता आहे. प्रत्येक महिन्याला डिझेलचा दर लिटरमागे 40-50 पैशांनी वाढवण्याचं धोरण राबवण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने शिफारशी स्वीकारल्या तर ही दरवाढ अटळ आहे. तीन दिवसांअगोदरच पेट्रोलच्या दरात 1.69 तर डिझेल 50 पैशांनी वाढवण्यात आले आहे.

त्यापाठोपाठ आता सिलेंडरच्या दरात वाढ करण्याचा विचार सुरू आहे. पण एकदाच ही दरवाढ न करता प्रत्येक महिन्याला ही दरवाढ केली जाणार असल्याचं कळतंय. आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी सरकार सबसिडीवर नियंत्रण आणू इच्छित आहे.

पेट्रोलियम कंपन्या सध्या डिझेल, केरोसीन आणि एलपीजीच्या खरेदीवर दररोज 250 कोटीचं नुकसान सहन करत आहे. डिझेलवर प्रतिलिटर 1.62 पैसे, केरोसीनवर 33 रुपये आणि एलपीजीवर प्रति सिलेंडर 433 रुपये सबसिडी द्यावी लागत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 4, 2014 11:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close