S M L

मोदी सरकारचं पहिलं बजेट अधिवेशन आजपासून

Samruddha Bhambure | Updated On: Jul 7, 2014 04:44 PM IST

मोदी सरकारचं पहिलं बजेट अधिवेशन आजपासून

Modi in parliament house07  जुलै :  लोकसभा निवडणुकीत बहुमताने सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारची खरी कसोटी आजपासून सुरू होणार्‍या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लागणार आहे. नव्या सरकारचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प 8 जुलैला तर केंद्रीय अर्थसंकल्प 10 जुलै रोजी मांडला जाणार आहे. मोदी सरकारचं हे पहिलंवहिलं बजेट असल्यामुळे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हा अर्थसंकल्प मांडतील तर रेल्वेमंत्री सदानंद गौडा हे रेल्वे बजेट मांडतील. तब्बल महिनाभर म्हणजेच 14 ऑगस्टपर्यंत चालणार्‍या या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस महागाई, इंधन दरवाढ आणि रेल्वे भाडेवाढ या विषयांवरून मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करेल. मध्य प्रदेशातला मेडिकल कॉलेज घोटाळाही काँग्रेस लावून धरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर गृहमंत्री राजनाथ सिंह आंध्र प्रदेश पुनर्स्थापना सुधारणा विधेयक मांडतील. इराकमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या परिस्थितीवरही सरकार या अधिवेशनात निवेदन सादर करू शकते.

महागाईविरोधात केंद्र सरकारची रणनीती

  • डाळी, कडधान्य, कांदा, बटाटा आणि टोमॅटोच्या पुरवठ्यावर भर
  • तुटवडा निर्माण होऊ शकणार्‍या भागांवर लक्ष ठेवण्याच्या राज्यांना सूचना
  • किमतींवर लक्ष ठेवणार्‍या समित्यांची स्थापना राज्य सरकार करणार
  •  किमती स्थिरावण्यासाठी केंद्र सरकार वेगळ्या फंडाची स्थापना करण्याची शक्यता
  • एपीएमसी कायद्यातून फळं आणि भाज्यांना वगळणार
  • साठेबाजी, कृत्रिम तुटवड्यावर राज्य सरकार कारवाई करणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 7, 2014 10:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close