S M L

विरोधीपक्षनेतेपद द्याच नाहीतर कोर्टात जाऊ- कमलनाथ

Samruddha Bhambure | Updated On: Jul 7, 2014 04:30 PM IST

विरोधीपक्षनेतेपद द्याच नाहीतर कोर्टात जाऊ- कमलनाथ

Kamal-Nath_707  जुलै :  संसदेच्या बजेट अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. मोदी सरकारचं हे पहिलं बजेट अधिवेशन असून केंद्रातील विरोधी पक्षनेतेपद कुणाला द्यायचे याचा वाद अजूनही कायम आहे. याविषयी काय पाऊल उचलायचं, याबाबत काँग्रेस आज निर्णय घेणार आहेत. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी काँग्रेस एक बैठक घेणार आहे. त्यात पुढची रणनीती ठरवली जाईल. पण त्याअधी काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी थेट लोकसभेच्या सभापती सुमित्र महाजनांचा विरोधी पक्षनेतेपदाबाबतचा निर्णय काँग्रेसविरोधात गेला तर काँग्रेसनं कोर्टात गेलंच पाहिजे, असं म्हटलं आहे.

लोकसभा अध्यक्ष या भाजपच्या आहेत हे आम्हाला माहीत आहे. वादाचा मुद्दा निर्माण झाला तर भाजप आणि मोदी अध्यक्षांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतील. याचा अर्थ असा नाही की त्या कुणाच्या सांगण्यावरून काम करतायेत. पण प्रभाव हा नेहमीच असतो, असं असेल तर आम्ही कोर्टात गेलंच पाहिजे. तो एक पर्याय असलाच पाहिजे, असं कमलनाथ म्हणाले.

काँग्रेसकडे लोकसभेत 44 सदस्य आहेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी त्यांना आणखी 10 सदस्यांची गरज आहे. विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी आवश्यक संख्याबळ काँग्रेसकडे नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद मिळावं यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. दरम्यान, काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याचा नैतिक, राजकीय आणि घटनात्मक अधिकार नाही, असं भाजपनं म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 7, 2014 11:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close