S M L

बजेटमुळे नोकरदारांचे 'अच्छे दिन' धोक्यात

Sachin Salve | Updated On: Jul 7, 2014 06:19 PM IST

बजेटमुळे नोकरदारांचे 'अच्छे दिन' धोक्यात

07 जुलै : मोदी सरकारच्या पहिल्या बजेट अधिवेशनाला सुरुवात झाली असून लवकरच जनतेसाठी पहिलं बजेट सादर करणार आहे. पण मोदी सरकारच्या पहिल्या बजेटमधून नोकरदार वर्गाला दिलासा मिळण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आर्थिक मर्यांदांमुळे सरकारचे हात बांधले गेले आहेत.

इन्कम टॅक्सची मर्यादा 2 वरुन 5 लाख केल्यास तिजोरीवर 64 हजार कोटींचा बोजा पडणार आहे. त्यामुळे टॅक्सवरची सवलतीची मर्यादा वाढण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गृहकर्जावरच्या व्याजावर सवलतीची मर्यादा मात्र दीड लाखांवरुन तीन लाखांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. पण, कोणत्याही प्रकारच्या टॅक्समध्ये वाढ होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे आता बजेटमध्ये नेमकं काय पदरात पडणार आहे याची प्रतिक्षा सर्वांना लागून आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 7, 2014 05:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close