S M L

विरोधी पक्षनेतेपद पाहिजेच !

Sachin Salve | Updated On: Jul 7, 2014 11:35 PM IST

345soniagandhi07 जुलै : काँग्रेस हा मोठा पक्ष आहे आणि आम्ही पराभव मान्यही केलेला आहे. पण काँग्रेस हा मोठा विरोधी पक्ष असल्यानं विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळायला हवं अशी मागणी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली.

लोकसभेतल्या विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्ष लोकसभा अध्यक्षांना औपचारिक पत्र लिहिणार आहे. विरोधी पक्षनेतेपद आपल्याला मिळावं अशी काँग्रेसची मागणी आहे. काँग्रेस हा लोकसभेतला दुसर्‍या क्रमांकाचा प्रश्न आहे, त्यामुळे काँग्रेसला हे पद मिळालेच पाहिजे असं सोनिया गांधी यांनी सीएनएन आयबीएनशी बोलताना स्पष्ट केलंय.

यासंदर्भात रणनिती आखण्यासाठी काँग्रेसची आज बैठक होणार आहे तर मल्लिकार्जुन खर्गे हे उद्या (मंगळवारी)काँग्रेसच्या सर्व खासदारांना भेटणार आहेत. काँग्रेसच्या लोकसभेत 44 जागा आहेत, विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी त्यांना अजून 11 जागा हव्या होत्या.

सोनिया गांधींची मागणी

काँग्रेस हा मोठा पक्ष आहे आणि आम्ही पराभव मान्यही केलेला आहे. पण काँग्रेस हा मोठा विरोधी पक्ष असल्यानं विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळायला हवं. कायदेशीर पर्यायांचा आम्ही विचार करू.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 7, 2014 10:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close