S M L

भाजप-तृणमूल काँग्रेसच्या खासदारांचा लोकसभेत धिंगाणा

Sachin Salve | Updated On: Jul 8, 2014 10:08 PM IST

भाजप-तृणमूल काँग्रेसच्या खासदारांचा लोकसभेत धिंगाणा

tmc_bjp08 जुलै : रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी बजेट सादर केल्यानंतर लोकसभेत आज (मंगळवारी) लज्जास्पद प्रसंग घडला. हे बजेट मागे घ्या अशी मागणी करणारे तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि भाजपच्या खासदारांमध्ये जोरदार संघर्ष झाला.

हे खासदार अक्षरशः हातघाईवर आले. साडेतीन वाजता लोकसभेचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर आम आदमी पार्टी आणि तृणमूलचे खासदार अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत उतरून सरकारविरोधी घोषणा देत होते.

त्यांना उत्तर देण्यासाठी भाजपचे 2 खासदारही मोकळ्या जागेत धावले, तेव्हा भाजप आणि तृणमूलच्या खासदारांदरम्यान बाचाबाची झाली. भाजपचे खासदार दारू पिऊन आले होते, आपण सरकारविरोधी घोषणा दिल्यामुळेच भाजपच्या खासदारांनी आपल्याला धमकी दिली असा दावाही कल्याण बॅनर्जी यांनी संसदेबाहेर केला. मात्र, हा प्रकार म्हणजे तृणमूलच्या खासदारांचं नाटक असल्याची टीका भाजपचे खासदार हरी नारायण राजभर यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 8, 2014 10:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close