S M L

विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसची धावाधाव

Sachin Salve | Updated On: Jul 9, 2014 03:47 PM IST

विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसची धावाधाव

a01sonia_gandhi09 जुलै : लोकसभा निवडणुकीत लाजीरवाण्या पराभवामुळे काँग्रेसची आता विरोधी पक्षनेतेपदासाठी धावपळ सुरू आहे. मात्र आता विरोधी पक्षनेतेपदावरून वाद पेटला आहे. काँग्रेसने या पदावर दावा केलाय.

काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, ज्योतिरादित्य सिंदिया आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यानी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची भेट घेतली. आणि 60 खासदारांच्या सह्यांचं पत्र त्यांना दिलं. या मुद्द्याचा अभ्यास करण्याचं आश्वासन महाजन यांनी दिलं.

पण सूत्रांच्या माहितीनुसार मोदी सरकार काँग्रेसला हे पद द्यायला तयार नाहीय. विरोधी पक्षनेतेपदाच्या निकषात काँग्रेस बसत नाही, असं कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी महाजन यांना सांगितलंय. पण पद मिळालं नाही तर सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा काँग्रेसने दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 9, 2014 03:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close