S M L

ये रे ये रे पावसा !, देशावर दुष्काळाचं सावट

Sachin Salve | Updated On: Jul 12, 2014 02:23 PM IST

ये रे ये रे पावसा !, देशावर दुष्काळाचं सावट

12 जुलै : मुंबई, कोकणात पाऊस असला तरी देशाच्या अनेक भागात मान्सून अजून सक्रिय झालेला नाही. कमकुवत मान्सूनमुळे यंदा देशात दुष्काळाचं सावट आहे. 5 वर्षांनी पुन्हा एकदा देशात दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, 15 जुलैपासून मान्सून मध्य आणि वायव्य भारतात सक्रिय होण्याचा अंदाज हवान खात्याने व्यक्त केलाय.

दरवर्षी 15 जुलैपर्यंत मान्सून देशभरात पसरतो. पण यावेळी मात्र मान्सून अपेक्षेप्रमाणे पुढे सरकलेला नाहीय. देशाच्या अनेक भागात लाखो हेक्टरवरच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मुंबई, कोकण वगळता पावसाने पाठ फिरवली आहे.

पुणे, मराठवाडा, विदर्भात पावसाने अजूनही हजेरी लावली नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. अनेक पेरण्या खोळंबल्या आहेत. पुण्यात एकदिवसाआड पाणीपुरवढा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. जर आणखी पाऊस लांबला तर पाणीटंचाआईतं संकट आणखी ओढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 12, 2014 01:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close