S M L

'निर्भया'च्या दोन मारेकर्‍यांच्या फाशीला स्थगिती

Sachin Salve | Updated On: Jul 14, 2014 06:31 PM IST

delhi gang rape new ok14 जुलै : संपूर्ण देशाला हादरावून सोडणार्‍या दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाचा धक्कादायक निकाल आलाय. निर्भया बलात्कार प्रकरणातील दोन आरोपींच्या फाशीला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.

अक्षय आणि विनय या आरोपींच्या फाशीवर स्थगिती देण्यात आलीय. दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेला दोषींनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. त्यावर कोर्टाने हा निकाल दिलाय. या प्रकरणातील पाच आरोपींपैकी आणखी दोघांच्या फाशीच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच स्थगिती दिलीय. एका आरोपीने तिहार जेलमध्ये आत्महत्या केली होती. तर सहावा आरोपी हा अल्पवयीन आहे.

16 डिसेंबर 2012 रोजी या सहा जणांनी निर्भयावर सामूहिक बलात्कार करुन अत्याचार केले होते.यात तिचा मृत्यू ओढवला होता. तब्बल दोन वर्षानंतर 14 मार्च 2014 रोजी निर्भयाच्या मारेकर्‍यांना बलात्कार आणि हत्ये प्रकरणी दुर्मिळातील दुर्मिळ खटला नमूद करत ट्रायल कोर्टाने आरोपी मुकेश, अक्षय ठाकूर, पवना गुप्ता आणि विनय शर्माला फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेच्या विरोधात दोषींनी हायकोर्टात धाव घेतली होती. दोनच दिवसांनी हायकोर्टाने दोन दोषींच्या फाशीवर स्थगितीचा निर्णय दिला होता. आता सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम राखत स्थगिती दिलीय.

दिल्ली गँगरेप प्रकरणाचा घटनाक्रम

16 डिसेंबर : 23 वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि जीवघेणा हल्ला

17 डिसेंबर : बस ड्रायव्हर राम सिंग आणि इतर 2 आरोपींनी अटक

22 डिसेंबर : एका अल्पवयीन आरोपीसह सर्व 6 आरोपींना अटक

22-23 डिसेंबर : इंडिया गेटवर हजारोंची निदर्शनं

29 डिसेंबर : 13 दिवसांनंतर निर्भयाचा सिंगापूरमध्ये मृत्यू

3 जानेवारी : 5 आरोपींवर आरोपपत्र दाखल

3 जानेवारी : अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी

2 फेब्रुवारी : 5 आरोपींवर फास्ट्र ट्रॅक कोर्टात 13 गुन्हे दाखल

5 फेब्रुवारी : कोर्टात साक्षीदारांची साक्ष नोंदवायला सुरुवात

28 फेब्रुवारी : अल्पवयीन आरोपीवर ज्युवेनाईल जस्टिस बोर्डाकडून बलात्कार आणि खुनाचे गुन्हे दाखल

11 मार्च : मुख्य आरोपी राम सिंगची तिहार तुरुंगात आत्महत्या

13 मार्च 14 : चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली

15 मार्च 14 : दोघांच्या फाशीवर हायकोर्टाची स्थगिती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 14, 2014 06:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close