S M L

अमित शाहांसोबत महाराष्ट्र भाजप कोअर कमिटीची बैठक

Samruddha Bhambure | Updated On: Jul 15, 2014 10:11 AM IST

अमित शाहांसोबत महाराष्ट्र भाजप कोअर कमिटीची बैठक

15   जुलै :  भाजपचे नवीन अध्यक्ष अमित शाह यांच्या सोबत महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीच्या सदस्यांची आज नवी दिल्लीत बैठक होतेय. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे उपस्थित राहणार आहेत.

अमित शाह यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतरची ही पहिलीच बैठक आहे. राज्यात शिवसेनेबरोबरचं जागा वाटप, पक्षाची विधानसभेतली रणनीती याबाबत या बैठकीत महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानं अमित शाह आपलं पूर्ण लक्षं आता राज्यांवर केंद्रीत करणार असल्याचही बोललं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 15, 2014 10:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close