S M L

दिल्लीच्या तख्तासाठी भाजप सरसावले !

Sachin Salve | Updated On: Jul 17, 2014 11:07 PM IST

'   Bharatiya Janata Party supporters celebrate outside the BJP office in Mumbai on 16th May 2014 after the party is set to win 281 seats on its own, nine more than the majority mark - which means that it could have formed government even without its pre-poll allies.   Sumedh Sawant / Indus Images'

'

17 जुलै : गेल्या चार महिन्यांपासून दिल्लीचे तख्त रिकामेच असल्यामुळे आता सत्तास्थापनेसाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. नायब राज्यपालांनी निमंत्रण दिलं तर सरकार स्थापनेच्या पर्यायांचा विचार करू, असं दिल्ली भाजपचे अध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी सांगितलंय.

काँग्रेसच्या नेत्या बरखा शुक्ला यांनीही सत्ता स्थापनेत रस असल्याचे संकेत दिले आहेत. भाजप काँग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करत असल्याच्या बातम्यांचा काँग्रेसनं मात्र इन्कार केलाय.

तर काँग्रेसचे आमदार फोडून सरकार स्थापन करणार असल्याच्या चर्चेचा भाजपनंही इन्कार केलाय. दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी नायाब राज्यपालांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना परवानगी नाकारण्यात आली.

केजरीवाल भडकले राज्यपालांवर घसरले

दरम्यान, दिल्लीमध्ये भाजप आमदारांच्या सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्यात. त्या पार्श्वभूमीवर आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. तसं ट्विट त्यांनी केलंय.

भाजपनं याआधीच नायब राज्यपालांनी दिलेली सत्तास्थापनेची ऑफर धुडकावलीये. त्यामुळे सध्याच्या विधानसभेसाठी राज्यपाल पुन्हा एकदा त्याच पक्षाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देऊ शकतात का? मात्र भाजपला निमंत्रण न देणं राज्यपालांना परवडेल का ?, कारण अन्यथा इतर राज्यांप्रमाणे दिल्लीच्याही राज्यपालांवर राजीनामा किंवा बदलीची तलवार कोसळू शकते.

राज्यपाल आपली खुर्ची वाचवतायेत की राज्यघटनेप्रमाणे वागणार आहेत याची देशाला उत्सुकता आहे. दरम्यान आम आदमी पक्षाच्या आमदारांसह मी नायब राज्यपालांचा भेटीसाठी वेळ मागितलीये असं केजरीवाल यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 17, 2014 10:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close