S M L

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस, चारधाम यात्रा स्थगित

Sachin Salve | Updated On: Jul 19, 2014 09:29 PM IST

Image img_237042_rain5_240x180.jpg19 जुलै : उत्तर भारतात मान्सून दाखल झाला आहे मात्र उत्तराखंडच्या काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. काही ठिकाणचे रस्तेही बंद करण्यात आले आहेत.

पावसामुळे चारधाम यात्रेवरही अनिश्चिततेचं सावट आहे. सध्या तरी चारधाम यात्रा स्थगित करण्यात आली आहे. केंद्र सरकारने खबरदारी म्हणून दोन एमआय-17 हेलिकॉप्टर पाठवण्याचं ठरवलंय.

प्रशासनाने रुद्रप्रयाग आणि उत्तरकाशी याठिकाणी अलर्ट जारी केला आहे. तर दुसरीकडे हिमाचल प्रदेशातही मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 19, 2014 09:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close