S M L

जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांची युती तुटली

Samruddha Bhambure | Updated On: Jul 20, 2014 07:10 PM IST

जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांची युती तुटली

20  जुलै : जम्मू काश्मीरमधली नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांच्यातली आघाडी तुटली आहे. जम्मू काश्मीरमध्ये येत्या वर्षाअखेर होणारी विधानसभा निवडणुक स्वबळावर लढण्याची घोषणाही दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिली आहे.

या वर्षाअखेर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. सध्या जम्मूत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांची युती आहे. पण आगामी विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स स्वबळावर लढणार आहे. याबद्दल मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी यासंबंधी ट्विटही केलं आहे. '10 दिवसांपूवच् मी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीची भेट घेऊन आमच्या निर्णयाची माहिती दिली होती. त्यांनी दिलेल्या सहका-याबद्दल त्यांचे आभारही मानले असे अब्दुल्ला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तर बहुमत आजमावण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचं काँग्रेसनेते गुलामनबी आझाद यांनी म्हटलं आहे. 44 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 20, 2014 03:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close