S M L

दिल्लीत नव्याने निवडणुका घ्या : आप

Samruddha Bhambure | Updated On: Jul 21, 2014 02:28 PM IST

kejru

21   जुलै :   दिल्लीमध्ये सरकार स्थापनेसाठी घडामोडींना वेग आला आहे. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज (सोमवारी) नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेतली आणि दिल्लीमध्ये नव्यानं निवडणुका घेण्याची मागणी केली.

राज्यपालांची भेट घेतल्यावर पत्रकारांशी बोलताना मनीष सिसोदिया म्हणाले, सध्या दिल्लीत कोणीही सरकार स्थापन करू शकत नाही, त्यामुळे आम्ही दिल्लीत नव्याने विधानसभा निवडणुका घेण्याची मागणी नायब राज्यपालांकडे केली आहे. नव्याने निवडणुका घेण्याबाबत भाजपशी चर्चा करू, असे आश्वासन राज्यपालांनी आम्हाला दिले. नव्याने निवडणुकांबाबतचा अहवाल राष्ट्रपतींकडे सोपविण्यात येईल.

दरम्यान, भाजपचे नेते हे आप आणि काँग्रेसच्या आमदारांना 20 कोटींची लाच देऊ करत असल्याचा आरोप आपने केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 21, 2014 01:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close