S M L

क्वात्रोकीला सोडण्यास काँग्रेस जबाबदार - अडवाणींचा आरोप

28 एप्रिल बोफोर्स घोटाळा प्रकरणातले प्रमुख आरोपी ओट्टावियो क्वात्रोकी याचं नाव सीबीआयच्या मोस्ट वॉन्टेड यादीतून वगळण्यात आलं आहे. क्वात्रोकीवर घेतलेल्या निर्णयाला काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी केला आहे. लालकृष्ण अडवाणी यांच्या आरोपांमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर बोफोर्स प्रकरणाचं भूत काँग्रेसच्या मानगुटीवर बसणार असं दिसतआहे. तसंच क्वात्रोकी हे सोनिया गांधीचे जवळचे असल्याचे सांगत लालकृष्ण अडवाणी यांनी सोनिया गांधी यांनाही लक्ष्य केलं आहे. बोफोर्स प्रकरणातला प्रमुख आरो़पी आणि इटालियन उद्योगपती ओट्टावियो क्वात्रोकी याच्यावर 10 वर्षांपूर्वी रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली होती. ही नोटीस इंटरपोलच्या बेबसाईटवर दिसत होती. पण अचानक ती नोटीस दिसायची बंद झाल्याची बातमी इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्रानं दिली आहे. क्वात्रोकीविरुध्द जारी करण्यात आलेली रेड कॉर्नर नोटीसही काढून घेण्यात आली असून त्याचं नाव सीबीआयच्या मोस्ट वॉन्टेड यादीतून वगळण्यात आल्याचंही त्या बातमीत नमूद केलं आहे. या संदर्भात सीबीआयला विचारलं असता सीबीआयचे संचालक अश्विनी कुमार आणि कायदामंत्री एच.आर.भारद्वाज यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं सीबीआयचे प्रवक्ते हर्ष बहल यांनी सांगितलं आहे. तसंच प्रत्यक्षात याबाबतची अधिकृत माहिती उद्या 30 एप्रिलला सीबीआयतर्फे कोर्टात मांडली जाणार असल्याची माहिती सीबीआयचे प्रवक्ते हर्ष बहल यांनी दिली आहे. क्वात्रोकीच्या वकिलांनी 2008मध्ये क्वात्रोकीला रेड कॉर्नरच्या नोटीसमधून वगळण्यात यावं यासाठी भारताच्या सुप्रिम कोर्टाकडे विनंती केली होती. भारताचे ऍटॉर्नी जनरल मिलॉन बॅनर्जी यांनी सीबीआयला क्वात्रोकीच्या विरोधातली रेड कॉर्नर नोटीस परत घेण्याचे आदेश दिले. ' वारंवार प्रयत्न करूनही क्वात्रोकी याला पकडण्यात भारताला अपयश आलंय. म्हणून ही रेड कॉर्नर नोटीस मागे घेण्यात यावी, ' असं मिलोन बॅनर्जी क्वात्रोकी प्रकरणावर म्हणाले आहेत. __PAGEBREAK__क्वात्रोची आणि बोफोर्स प्रकरणी सरकारनं कुठलाही हस्तक्षेप केलेला नाही. या प्रकरणी सीबीआयवरही दबावाचा काही प्रश्नच नाही. केवळ राजकारणातून विरोधी पक्ष आरोप करत आहेत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय कायदेमंत्री एच आर भारद्वाज यांनी दिली आहे.15 व्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुमकेतूप्रमाणे आलेलं क्वात्रोकी प्रकरण म्हणजे काँग्रेसच्या हातात आलेलं कोलीतच आहे. विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी या प्रकरणात काँग्रसेला जबाबदार धरलं आहे. ' सामान्य माणसाच्या बरोबर आहोत, असा आव आणणारी काँग्रेस प्रत्यक्षात मात्र क्वात्रोकीच्या सोबत आहे. महात्मा गांधींनी परकीयांना भारतातून हुसकावून लावलं पण काँग्रेसनं परदेशी आरोपीला रेडकॉर्नर नोटीसमधून हुसकावून लावलं आहे. सत्तेवर येण्यापूर्वी काँग्रेसला या प्रकरणातून स्वत:ची सुटका करून घ्यायची आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी क्वात्रोकी प्रकरणावर दिली आहे. मात्र काँग्रेसने भाजपचे आरोप फेटाळून लावले आहेत. क्वात्रोकी प्रकरणाचा निवडणुकीशी काही संबंध नाही, असं प्रियांका गांधी-वढेरा यांनी सांगितलं आहे. तर ' सीबीआयच्या मोस्ट वॉन्टेड यादीतून वगळणं हे पूर्णत: सरकार आणि ती ठरावीक व्यक्ती यांच्यातला प्रश्न आहे. 20 वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणाचा काँग्रेसशी काडीचाही संबंध नाही. क्वात्रोकीबाबत ऍटॉर्नी जनरल यांनी निर्णय घेतला आहे. याचा काँग्रेसशी संबंध जोडला जाऊ नये, असं काँग्रसचे प्रकक्ते अभिषेक मनू संघवी म्हणाले. पण हा क्वात्रोकी आहे तरी कोण ? आणि सीबीआयला तो का हवा होता?सिसिलीमध्ये जन्मलेला क्वात्रोकी 60 च्या दशकात एका इटालियन गॅस आणि ऑईल कंपनीचा प्रतिनिधी म्हणून भारतात आला.क्वात्रोचीची सोनियांच्या माध्यमातून गांधी घराण्याशी जवळीक होती.सोनिया याही इटलीच्याच.1987 ला बोफोर्स घोटाळा उघडकीस आला..आणि या घोटाळ्यातला दलाल म्हणून क्वात्रोकीवर दोषपत्र ठेवण्यात आलं.सत्ताधारी काँग्रेस पक्ष त्यामुळे चांगलाच अडचणीत आला. 1989 ला काँग्रेसला सत्ताही गमवावी लागली.1993 ला अधिकृतरित्या क्वात्रोकीला दोषी करार करण्यात आलं. .

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 28, 2009 03:57 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2009 03:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close