S M L

शिक्षकी पेशाला काळिमा, अंध विद्यार्थ्यांना निर्दयपणे मारहाण

Sachin Salve | Updated On: Jul 21, 2014 09:13 PM IST

शिक्षकी पेशाला काळिमा, अंध विद्यार्थ्यांना निर्दयपणे मारहाण

21 जुलै : 'छडी लागे छम विद्या येई घम घम..' विद्यार्थी आणि शिक्षकांच्या नात्यातलं हे बालगीत गायलं जातं. पण याचा नात्याला काळीमा फासणारी घटना हैदराबादजवळच्या काकिनाडा शहरात घडलीय. हैदराबादपासून जवळच असलेल्या काकिनाडा शहरामध्ये तीन अंध मुलांना त्यांच्या शिक्षकांनी आणि एका अज्ञात व्यक्तीने बेदम मारहाण केल्याचं एका व्हिडिओमुळे उघड झालंय.

ही मुलं त्यांच्या शिक्षकाकडे विनवण्या करत असल्याचं दिसतंय. पण या विनवण्या न ऐकता त्यांच्या शिक्षकाने बेदम मारहाण सुरूच ठेवली. छडी, लाथा बुक्यांनी या विद्यार्थ्यांना मारहाण केलीय. या अंध विद्यार्थ्यांनी मार वाचवण्यासाठी शिक्षकांचे पाय धरले पण या शिक्षकांने दया न दाखवता या विद्यार्थ्यांना पायाने तुटवले.

या सर्व विद्यार्थ्यांचं वय 10 वर्ष असल्याचं कळतंय. या प्रकरणी व्हिडिओतून दिसणार्‍या दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून शिक्षकांना अटक करण्यात आलीय. आरोपी शिक्षक काकिनाडामध्ये ग्रीनफिल्ड रेजिडेंशियल स्कूल चालवतात. याच शाळेत हे तीन अंध विद्यार्थी राहतात. दरम्यान, बाल हक्क संरक्षण आयोगाने या प्रकरणी चौकशीचं आश्वासन दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 21, 2014 06:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close