S M L

महाराष्ट्र सदनात मराठी कलाकारांनाच परवानगी नाकारली

Sachin Salve | Updated On: Jul 21, 2014 10:48 PM IST

maharashtra_sadan21 जुलै : दिल्लीत महाराष्ट्र सदनात मराठी कलाकारांना कार्यक्रमाची परवानगी नाकारण्यात आलीय. सह्याद्री महोत्सव-2014 या कार्यक्रमाला ही परवानगी नाकारण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी व्यासपीठ लावण्यापासून ते जेवणाच्या व्यवस्थेपर्यंत परवानगी नाकारण्यात आली होती. तसंच या परिसरात चित्रप्रदर्शन, बाहेर स्क्रीन लावण्यास परवानगीही नाकारली.

या पूर्वीही सदनात अनेक कार्यक्रम झाले त्यांना परवानगी देण्यात आली होती. पण सदनाचे निवासी आयुक्त बिपीन मलीक यांनी परवानगी नाकारली विशेष म्हणजे या कार्यक्रमात अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा चित्रपट दाखवला जाणार होता. अनेक मराठी केंद्रीय मंत्री या कार्यक्रमाला हजर राहणार होते. पण ऐनवेळेला या कार्यक्रमाचं स्थळ बदलावं लागलंय. आता हा कार्यक्रम उद्या होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 21, 2014 09:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close