S M L

राहुल गांधींमुळेच पराभव, अँटोनी समितीचा घरचा अहेर

Samruddha Bhambure | Updated On: Jul 22, 2014 02:52 PM IST

4547Rahul_Gandhi

22  जुलै :  काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींच्या कार्यपद्धतीवर अँटोनी समितीने ठपका ठेवल्याची माहीती सूत्रांनी सीएनएन आयबीएनला दिली आहे. अँटोनी समितीच्या आहवालात हा ठपका ठेवण्यात आला आहे. राहुल गांधींवर काँग्रेसमधून ही आतापर्यंतची सर्वात गंभीर टीका मानली जातेय.

मिळालेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांची भेट मिळणं कठीण असून अनेकदा लोकांना कित्येक महिने थांबावं लागतं, असं अँटोनी यांनी या अहवालात म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्या समाजिकसंस्थेच्या स्टाईलने काम करण्याच्या पद्धतीवरही या अहवालात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.

काँग्रेसमधून राहुल गांधी यांच्यावर पहिल्यांदाच एवढ्या गंभीर प्रकारची टीका करण्यात आली आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांना टक्कर देण्यासाठी प्रियांका गांधी अधिक सक्षम असल्याचं अनेक काँग्रेस नेत्यांचं मत असल्याचंही या अहवालात म्हणण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 22, 2014 02:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close