S M L

मराठी कार्यक्रमाला परवानगी का नाही?, महाराष्ट्र सदनावर सेनेचा हल्लाबोल

Samruddha Bhambure | Updated On: Jul 22, 2014 03:20 PM IST

मराठी कार्यक्रमाला परवानगी का नाही?, महाराष्ट्र सदनावर सेनेचा हल्लाबोल

22 जुलै : दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात मराठी कलाकारांना कार्यक्रमाची परवानगी नाकारल्याच्या मुद्यावर आता शिवसेना आक्रमक झालीये. महाराष्ट्र सदनात उडिया कार्यक्रमांना परवानगी मिळते मग मराठी कार्यक्रमांना का मिळत नाही, असा संतप्त सवाल सेनेच्या खासदारांनी विचारला आहे. या प्रश्नी सदनाचे निवासी आयुक्त बिपीन मलिक यांना जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे खासदार महाराष्ट्र सदनात गेले होते. मलिक यांनी त्यांना बैठकीचं कारण देत भेट घेण्याचं टाळलं. यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना खासदारांनी मलिकांसारख्या अधिकार्‍यांना मुख्यमंत्री पाठिशी घालत असल्याचा आरोप केला आहे.

सह्याद्री महोत्सव-2014 या कार्यक्रमाला ही परवानगी नाकारण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी व्यासपीठ लावण्यापासून ते जेवणाच्या व्यवस्थेपर्यंत परवानगी नाकारण्यात आली होती. तसंच या परिसरात चित्रप्रदर्शन, बाहेर स्क्रीन लावण्यासही परवानगी नाकारली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सदनाचे मॅनेजर सेनेच्या नेत्यांना भेटण्यासाठी संसदेतल्या शिवसेनेच्या कार्यालयात गेले. शिवसेना खासदारांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सदनातील सुरक्षा वाढवण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र सदनातल्या अधिकार्‍यांनी दिल्ली पोलिसांकडे केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 22, 2014 03:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close