S M L

महाराष्ट्र सदनातल्या वादाला जातीय रंग?

Samruddha Bhambure | Updated On: Jul 23, 2014 01:29 PM IST

महाराष्ट्र सदनातल्या वादाला जातीय रंग?

23   जुलै :  महाराष्ट्र सदनातल्या वादाला धार्मिक रंग येऊ लागला आहे. महाराष्ट्र सदनामध्ये मिळणार्‍या सेवा-सुविधांबद्दल शिवसेनेच्या 11 खासदारांनी 17 जुलैला आंदोलन केलं होतं. यावेळी जेवणाची तक्रार करताना त्यांनी कॅटरिंग सर्व्हिसच्या सुपरवायझरला जबरदस्तीने चपाती खायला लावली. हा सुपरवायझर मुस्लीम असून त्याचा रमझानचा उपवास होता, असं वृत्त एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालं आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

अर्शद झुबैर असं त्या सुपरवायझरचं नाव आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र सदनाच्या कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन पुकारलं आणि महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्तांकडे तक्रार केली. महाराष्ट्र सदनामध्ये कॅटरिंगचं काम आयआरसीटीसीकडे आहे. या संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी करत असल्याचं राज्य सरकारने आधीच सांगितलं आहे.

शिवसेनेच्या खासदारांनी मात्र हे वृत फेटाळलं आहे. संसदेतले अधिकारी चूक झाकण्यासाठी या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे तसंच बिपीन मलिक अरेरावी करतात असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 23, 2014 10:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close