S M L

कारगिल विजय दिनानिमित्त हुतात्म्यांच्या आठवणींना उजाळा

Samruddha Bhambure | Updated On: Jul 25, 2014 03:31 PM IST

कारगिल विजय दिनानिमित्त हुतात्म्यांच्या आठवणींना उजाळा

25  जुलै : कारगिल विजय दिवस. भारतीय वीर जवानांच्या शौर्याला सलाम करण्याचा दिवस. आज या युद्धाला 15 वर्ष पूर्ण होत आहे. भारताचे लष्करप्रमुख जनरल बिक्रम सिंग यांनी आज लडाखच्या द्रासमधल्या युद्ध स्मारकावर शहिदांना श्रद्धांजली वाहिली.

1999 साली आजच्या दिवशी भारताने कारगिलमध्ये पाकीस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवला होता. 'ऑपरेशन विजय' नावाखाली भारताने ही मोहिम फत्ते केली होती. कारगिलमध्ये पाकिस्तानाने घुसखोरी केली होती त्यानंतर हे युद्ध छेडलं गेलं. 60 दिवस चालणार्‍या या युद्धाच भारतीय वीर जवानांच्या शौर्यापुढे पाकिस्तानाला गुडघे टेकावे लागले. त्यानंतर पुन्हा एकदा भारताने टायगर हिल्सवर कब्जा मिळवला. या युद्धात दोन्ही देशांचे जवान शहिद झाले. करगिलच्या या वीर जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी दरवर्षी कारगिल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 25, 2014 11:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close