S M L

मोदी भारताचे हिंदू राष्ट्र करतील - दीपक ढवळीकर

Samruddha Bhambure | Updated On: Jul 25, 2014 03:52 PM IST

मोदी भारताचे हिंदू राष्ट्र करतील - दीपक ढवळीकर

25  जुलै : गोव्याचे सहकार मंत्री आणि भाजपचा मित्रपक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार दीपक ढवळीकर यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. नरेंद्र मोदींना पाठिंबा आणि सहकार्य दिलं तर भारत हिंदू राष्ट्र होईल, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

लोकसभेत मिळविलेल्या यशाबाबत मोदींचे अभिनंदन करणारा ठराव विधानसभेत मांडण्यात आला होता. त्यावेळी ढवळीकर यांनी हे वक्तव्य केले.

मोदींच्या नेतृत्वात भारत हिंदू राष्ट्र म्हणून विकसित होत असून, त्या दृष्टीने पंतप्रधान काम करतील, असे ढवळीकर म्हणाले. गोव्यातील बीचवर बिकनींवर बंदी घालावी असे वक्तव्य करणारे गोव्याचे परिवहनमंत्री सुदीन ढवळीकर यांचे भाऊ आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 25, 2014 01:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close