S M L

फक्त सोनिया गांधींचं बैठकीला हजर होत्या !

Sachin Salve | Updated On: Jul 25, 2014 07:24 PM IST

फक्त सोनिया गांधींचं बैठकीला हजर होत्या !

sonia_gandhi_congress_meet25 जुलै : लोकसभा निवडणुकीत लाजीरवाण्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये विसंवाद वाढल्याची चर्चा सुरू झाली. पण, या विसंवादाचा फटका आज (शुक्रवारी) चक्क पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनाच बसला.

काँग्रेसच्या संसदीय मंडळाची आज बैठक होती. या बैठकीला सोनिया गांधी पोचल्या. पण, कुणीच नेता तिथे नव्हता. अखेर सोनिया गांधींना माघारी फिरावं लागलं.

झालं असं की, ही बैठक सकाळी दहा वाजता बोलवण्यात आली होती. पण, सोनिया गांधी साडे नऊलाच पोचल्या. त्यामुळे तिथे कुणीच नव्हतं. मग सोनिया गांधी परतल्या आणि बैठक रद्द करावी लागली.

अगोदरच पराभवामुळे काँग्रेसच्या नेत्यांपासून ते खासदारांपर्यंत सर्वच जण पक्षाला घरचा अहेर देत आहे. लोकसभेतही विरोधी पक्षनेतेपद मिळत नाहीये. त्यातच पक्षांने बैठक बोलावूनही कुणीच न आल्यामुळे सोनियांना आल्या त्या वाटेने परतावे लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 25, 2014 07:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close