S M L

माळीण दुर्घटना अतिशय दु:खदायक-मोदी

Sachin Salve | Updated On: Jul 30, 2014 06:03 PM IST

narendra modi30 जुलै : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात भीमाशंकरजवळ माळीण गावात झालेल्या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेद व्यक्त केलाय. माळीणमध्ये झालेली दुर्घटना अतिशय दु:खदायक आहे. याबाबत राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सिंह उद्या पुण्याला जाणार आहे अशी माहिती मोदींनी ट्विटरवर दिली.

माळीण गावावर पहाटे डोंगराचा कडा कोसळून संपूर्ण गावच ढिगार्‍याखाली गेलंय. या दुर्घटनेत मृतांचा आकडा 25 वर पोहचला आहे. या गावात 44 घरं होती. एनडीआरएफच्या सात टीम बचावकार्यासाठी दाखल झाल्या आहेत. जेसीबीच्या साहाय्यानं सध्या बचावकार्य सुरू आहे. प्रशासकीय अधिकारी, पोलीस आणि वैद्यकीय अधिकारी घटनेच्या ठिकाणी आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री माळीण गावाला भेट देण्यासाठी रवाना झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 30, 2014 05:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close