S M L

काँग्रेसला आघाडी चालवायची अक्कलच नाही -त्रिपाठी

Sachin Salve | Updated On: Aug 1, 2014 06:07 PM IST

काँग्रेसला आघाडी चालवायची अक्कलच नाही -त्रिपाठी

d p tripathi01 ऑगस्ट : विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे पण जागावाटपाचा तिढा सुटत नसल्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या संयमाचा बांध फुटला असून नेत्यांचा तोलच आता ढळलाय. काँग्रेसला अडचण काय आहे, मुळात काँग्रेसला आघाडी चालवायची अक्कलच नाहीये, आघाडी तोडण्याचं काम तर काँग्रेसच करत आहे अशी जळजळीत टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते डी.पी.त्रिपाठी यांनी केली आहे.नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून जागावाटपावरुन आघाडीमध्ये कुरबुरी सुरू आहे. पण काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादीला एक जागाही वाढवून देणार नाही असं स्पष्ट केलंय. त्यामुळे आज राष्ट्रवादीचे प्रवक्ते डी पी त्रिपाठी यांनी काँग्रेसचा भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. काँग्रेसनं आता नवी परिस्थिती समजून घेऊन काम करावं, जर आघाडी तोडण्याचं काम काँग्रेसनं केलं तर त्या परिस्थितीला काँग्रेसचं जबाबदार असेल असं त्रिपाठी यांनी म्हटलंय.

मुळात काँग्रेसला आघाडी चालवायची अक्कलच नाहीये असा टोलाच त्रिपाठींनी लगावला. एकदा विधानसभेसाठी आघाडी अस्तित्त्वात आली की मग निवडणुकीत नेतृत्त्व कोण करणार याचा निर्णय घेता येईल असंही त्रिपाठी यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 1, 2014 06:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close