S M L

युद्धभूमीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे पाक सरकारचे आदेश

6 मे, इस्लामाबाद वायव्य सरहद्द प्रांतातल्या वॉर झोनमध्ये म्हणजे युद्धभूमीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश पाकिस्ताननं दिले आहेत. पाकिस्तान सरकारने दिलेल्या सगळ्या डेडलाईन तालिबाननं झुगारून दिल्या आहेत आणि शस्त्रं खाली ठेवायला ठाम नकार दिला आहे. त्यामुळे वायव्य सरहद्द प्रांतातल्या बुनेर, स्वात आणि दीरमधल्या हजारो लोकांचा जीव धोक्यात आहे. म्हणून या लोकांना तिथून बाहेर काढावं, असं पाक सरकारनं लष्कराला सांगितलं आहे. पाकिस्तानच्या स्वात प्रांतात तालिबान्यांनी घुसखोरी केली. काही काळातच तालिबान्यांनी स्वात प्रांतात शरियत कायदा लागू करून इस्लामी कायद्याचा अंमल सुरू केला आहे. तालिबान्यांनी स्वातनंतर बुनेरमध्येही घुसखोरी करण्यास सुरुवात केली. बुनेर इस्लामाबादपासून फक्त 100 किलोमीटर अंतरावर आहे. परिणामी पाकिस्तानात घुसखोरी करणार्‍या तालिबान्यांचा धोका आता पाक नागरिकांच्या गळ्यापर्यंत आला आहे. तालिबान्यांचं पाकिस्तावरचं वाढतं वर्चस्वच यातून स्पष्ट होतंय. तालिबानच्या ताब्यात जाणार की काय असं चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे. म्हणूनच पाकिस्तानातल्या दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी तसंच तालिबान्यांना परिसरातून हुसकावून लावण्यासाठी पाकनं युद्ध पुकारलं. आता वायव्य सरहद्द प्रांतातल्या वॉर झोनमध्ये म्हणजे युद्धभूमीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश पाकिस्ताननं दिले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 6, 2009 07:52 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 6, 2009 07:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close