S M L

माओवाद्यांचा नेता रवींद्र ऊर्फ अर्जुनचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण

Sachin Salve | Updated On: Aug 2, 2014 09:19 PM IST

माओवाद्यांचा नेता रवींद्र ऊर्फ अर्जुनचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण

ravindra_naxal02 ऑगस्ट : गडचिरोली जिल्ह्यातल्या माओवादी कारवायांच्या सशस्त्र लढयाचा कधीकाळी सुत्रधार असलेला माओवाद्यांचा नेता रवींद चम्बाला उर्फ अर्जुन आणि पत्नी रंजिताने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलंय.

माओवाद्यांना सुरक्षा दलाच्या विरुद्ध लढाईच प्रशिक्षण देणार्‍या मिल्ट्री शाळेचा प्रमुख जहाल माओवादी रवींद्र अर्जुनने शुक्रवारी तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. दंडकारण्यामध्ये अनेक जवानांना ठार मारण्याच्या रणनितीचा सुत्रधार असलेल्या रवींद्रवर वीस लाखाचं तर त्याची पत्नी रंजीतावर सात लाखाचं बक्षीस होते.

रवींद्रच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी चळवळीला हादरा बसला असून माओवाद्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाशी झालेल्या मतभेदामुळेच रवींद्रने माओवादी चळवळ सोडल्याचं मानलं जातंय.

उल्लेखनीय म्हणजे रवींद्रने गडचिरोलीतल्या पहिल्या मिल्ट्री दलम तसंच प्लाटुन दलमच नेतृत्व केलं होतं. सध्या रवींद्रवर देशभरातल्या माओवाद्यांची राजधानी असलेल्या अबुझमाडमध्ये माओवाद्याना गोरील्ला पद्धतीने लढण्याचे प्रशिक्षण देणार्‍या मोबाईल मिल्ट्री प्रशिक्षण केंद्राच्या प्रमुखपदाची जबाबदारी होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 2, 2014 06:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close