S M L

पंतप्रधान मोदी उद्या नेपाळ दौर्‍यावर

Sachin Salve | Updated On: Aug 2, 2014 09:39 PM IST

4233modi02 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (रविवारी) भारताचा शेजारी नेपाळच्या दौर्‍यावर जाणार आहेत. दोन दिवसांचा त्यांचा हा दौरा आहे. यावेळी ऊर्जाक्षेत्राबाबतच्या करारावर दोन्ही देशांदरम्यान सह्या होण्याची शक्यता आहे.

तसंच भारत नेपाळसाठी काही आर्थिक मदतीची घोषणाही करण्याची शक्यता आहे. भारताच्या पंतप्रधानांनी गेल्या 17 वर्षांतली नेपाळला ही पहिलीच भेट आहे.

माजी पंतप्रधान आय.के.गुजराल यांनी 1997 मध्ये नेपाळला भेट दिली होती. त्यानंतर आता नरेंद्र मोदी पहिल्यांदाच नेपाळ दौर्‍यासाठी रवाना होणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 2, 2014 09:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close