S M L

चौथ्या टप्प्यात 85 जागांसाठी मतदान

6 मे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 7 मे ला गुरूवारी आठ राज्यात मतदान होतंय. या चौथ्या टप्प्याच्या मतदानाची प्रचार फेरी काल संपली. या टप्प्यात 85 जागांसाठी 1 हजार 315 उमेदवार रिंगणात आहेत. जवळपास साडे नऊ हजार मतदार त्यांच्या भवितव्याचा निर्णय घेतील. 7 मे ला होणार्‍या या चौथ्या टप्प्यात दिल्ली, हरियाणा, राजस्थान, पंजाब, पश्चिम बंगाल बिहार, जम्मू आणि काश्मीर आणि उत्तर प्रदेशात मतदान होणार आहे. तर ओरिसामध्ये 25 मतदान केंद्रांवर फेरमतदान होणार आहे. नक्षलवादग्रस्त मलकानगिरी जिल्ह्यात हे फेरमतदान होतंय. मतदान सुरक्षित पार पडावं म्हणून या ठिकाणी अकराशे जवान तैनात करण्यात आलेत. 16 एप्रिलला या केंद्रांवरचं मतदान नक्षलवाद्यांनी उधळून लावलं होतं. तसंच 7 वाहनांना आग लावली होती. चौथ्या टप्प्यात आठ राज्यातील मतदान : राजस्थान - 25 हरियाणा - 10दिल्ली - 7 उत्तर प्रदेश - 18 पश्चिम बंगाल - 17पंजाब - 4 बिहार - 3जम्मू आणि काश्मीर - 1 राजधानी दिल्लीत मतदानादरम्यान अनुचित प्रकार होऊ नयेत यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या मदतीला इतर तीन राज्यांतून पोलिसांची कुमक मागवण्यात आली आहे. चौथ्या टप्प्याच्या मतदानासाठी अनेक दिग्गज उमेदवारांची कसोटी आहे. भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग, परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी, समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंग आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लालूप्रसाद यादव यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. छाप्रामधून पराभवाची भीती असल्यामुळे ते पुन्हा पाटलीपुत्रमधून निवडणूक लढवत आहेत. त्याशिवाय शत्रुघ्न सिन्हा, शेखर सुमन आणि राजबब्बर या अभिनेत्यांचं भवितव्यही 7 मे ला गुरूवारी मतदान यंत्रात बंद होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 6, 2009 03:43 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 6, 2009 03:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close