S M L

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

7 मेलोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात एकूण 8 राज्यात 85 जागांसाठी मतदान होतं आहे. 1 हजार 315 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. तर एकूण 9 कोटी 46 लाख मतदार आहेत. सध्यातरी धीम्या गतीनं मतदान सुरु आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत दिल्लीमध्ये जवळपास 5 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 12 टक्के, राजस्थानमध्ये 8 टक्के, उत्तरप्रदेशमध्ये 4 टक्के,मतदान झालं आहे. अनेक मान्यवरांनी आज सकाळी मतदान केलं. सोनिया गांधी, प्रियांका गांधी, लालूप्रसाद यादव, कपिल सिब्बल सचिन पायलट, विजय गोयल, सुखदेव थोरात या अनेक मान्यवरांनी आज सकाळी मतदान केलं. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीही सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला. लोकसभेच्या सात जागांसाठी दिल्लीमध्ये मतदान सुरु आहे. एकूण एकशे साठ उमेदवार इथं रिंगणात आहेत. तर 1 कोटी 1 लाख मतदार त्यांचं भवितव्य आज ठरणार आहेत. 11 हजार 348 मतदान केंद्रांवर मतदान होईल. तर यापैकी 25 लाख 42 हजार तरुण मतदार आहेत. इथे 258 मतदान केंद्र संवेदनशील आणि 40मतदान केंद्र अतिसंवेदनशील जाहीर करण्यात आली आहेत. इथं भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत सुरू आहे. या निवडणुकीत काँग्रेसनं विकास आणि चांगलं शासन या मुद्यांवर भर दिला आहे. तर भाजपनं दिल्लीतल्या सुमार कायदा व्यवस्थेचा मुद्दा उचलून धरलाय. चौथ्या टप्प्यात आज पंजाबमध्येही मतदान होतंय. पंजाबमध्ये लोकसभेच्या एकूण 13 जागा आहेत. पहिल्या टप्प्यात आज चार जागांसाठी मतदान होतंय. या चार मतदारसंघात एकूण 52 लाख 75 हजार मतदार आहेत. यात महिलांची संख्या जवळपास निम्मे आहे. 79 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 5 हजार सहाशे 94 मतदान केंद्रांवर मतदान होईल. यासाठी जवळपास 27 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. येथे शिरोमणी अकाली दल आणि भाजपची युती आहे.राज्यात केलेल्या विकासकामांचा दाखल हे पक्ष देतायत. तर काँग्रेसनं गव्हासाठी निश्चित दर आणि भ्रष्टाचार या मुद्यांवर प्रचार केलाय. तर डेरा सच्चा सौदा आणि इतर शीख संघटना यांच्यातल्या वादाचा परिणामही निवडणुकीवर होऊ शकतो. राजस्थानमध्ये प्रमुख लढत काँग्रेस आणि भाजपमध्ये आहे.सचिन पायलट हे अजमेरमधून निवडणूक लढवत आहेत. राजस्थानमध्ये आज लोकसभेच्या सगळ्या म्हणजेचं 25 जागांसाठी आज मतदान होतंय. इथे एकूण 346 उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी 30 महिला उमेदवार आहेत. तर 186 अपक्ष उमेदवार आहेत. राज्यात एकूण 3 कोटी 69 लाख मतदार आहेत. यापैकी पावणे दोन कोटी महिला उमेदवार आहेत. इथे भाजप आणि काँग्रेसमध्ये प्रमुख लढत होतेय. दोन्ही पक्ष पंचवीस जागांवर लढतायत. तर बसपा 24 जागांवर आणि माकप 3 जागांवर लढतंय. 42 हजार 591 मतदान केंद्रांवर आज मतदान होतयं. काँग्रेसनं इथं युपीएच्या विकासकामांचा दाखला देत प्रचार केला आहे. तर भाजपनं राज्यसरकारच्या कारभारावर टीका करत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 7, 2009 07:39 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 7, 2009 07:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close