S M L

मिझोरमच्या राज्यपाल कमला बेनिवाल यांची पदावरून हकालपट्टी

Samruddha Bhambure | Updated On: Aug 7, 2014 02:01 PM IST

मिझोरमच्या राज्यपाल कमला बेनिवाल यांची पदावरून हकालपट्टी

kamla-beniwal11

07  ऑगस्ट : मिझोरमच्या राज्यपाल कमला बेनिवाल यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. बेनिवाल यांचा फक्त दोन महिन्यांचा कार्यकाळ उरलेला असतानाच त्यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनातून बुधवारी रात्री बेनिवाल यांच्या हकालपट्टीबाबतचा निर्णय प्रसिद्ध करण्यात आला.

गेल्या महिन्यातच बेनिवाल यांची गुजरातच्या राज्यपालपदावरून मिझोरमच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा राज्यपालपदाचा कार्यकाळ दोन महिन्यांनी संपणार होता, मात्र त्यापूर्वीच त्यांना पदावरून हटवण्यात आलं. मिझोरमचे नवे राज्यपाल म्हणून विनोदकुमार दुग्गल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना बेनिवाल यांचे त्यांच्याशी मतभेद झाले होते. पाँडिचेरीचे नायब राज्यपाल वीरेंद्र कटारिया यांच्यानंतर हकालपट्टी होणार्‍या बेनिवाल या दुसर्‍या राज्यपाल आहेत.

दरम्यान बेनिवाल यांच्यावरील कारवाईचा विरोधी पक्षांनी तीव्र निषेध केला असून सूडभावनेतून ही कारवाई करण्यात आल्याची टीकाही करण्यात आली आहे. मात्र भाजपने या कारवाईचे समर्थन केले असून संविधानातील तरतुदींनुसारच बेनिवाल यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे सांगितलं आहे. तसंच यात कोणत्याही प्रकारचं राजकारण नसल्याचंही कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 7, 2014 01:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close