S M L

मुकुल शिवपुत्र यांचा शोध सुरू

8 मेभोपाळ सरकारचा सांस्कृतिक विभाग सध्या ध्रुपद गायक मुकुल शिवपुत्र यांचा शोध घेत आहे. ते कुमार गंधर्व यांचे पुत्र आहेत. मुकुल शिवपुत्र यांना गुरुवारी सकाळी भोपाळमध्ये हालाखीच्या अवस्थेत रस्त्यावर फिरताना काही जणांनी पाहिलं होतं. तेव्हापासून भोपाळ सरकार त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. 'त्यांना शोधण्याचे आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतोय', असं भोपाळचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं. एका आठवडा ते साईबाबांच्या देवळात राहत असून तीन दिवसांपूर्वीच ते तिथून गायब झाल्याचं काही लोकांकडून समजतंय.मिळलेल्या निळ्या आणि सफेद रंगाचा हाफ शर्ट, डार्क निळ्या रंगाची पॅन्ट घातलेले मुकुल येणार्‍या जाणार्‍या लोकांकडे दोन-दोन रुपये मागतात त्यानंतर जवाहर डेपो चौका जवळील दारुच्या दुकानात व्यसन करतात, अशी बातमी काल एका दैनिकाने दिली. त्यानंतर मध्यप्रदेश सरकराने शोध सुरु केला आहे. नशेच्या अवस्थेत असताना त्यांना कित्येकांनी स्वत:ची ओळख करुन देताना पाहिलं आहे असंही या दैनिकात म्हटलं आहे. 'माझं वय 53 आहे, मी गायक - संगीतकार आहे, देवासचा राहणारा आह', अशी ते स्वत:ची ओळख करुन देतात. लोक पाहुणचार करायला लागले तर मला काहीही नको असं सांगतात.मुक्तछंदी आणि मनमौजी स्वभाव असणारे मुकुल शिवपुत्र लोकांमध्येही फारसे मिसळत नसत. मोजक्याच मैफलींमध्ये गात असत. गेले काही वर्ष ते देवास येथे आपल्या घरी रहात होते तर इतर वेळी देशभर फिरत असत. गर्दीपासून लांब राहणार्‍या शिवपुत्र यांनी संगीतालाच आपला जवळचा मित्र मानलं. गेल्या वर्षी मुंबईत वसंतराव देशपांडे संगीत महोत्सवात त्यांनी आपली गायकी पेश केली होती. मुकुल यांचा जन्म 1956 मध्ये झाला. वडिल म्हणजेच कुमार गंधर्व यांनी लहान वयातच त्यांना शास्त्रीय संगीताचे धडे द्यायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी के.जी. गिंदे यांच्याकडून ध्रुपद धमार आणि एम. डी. रामनाथन यांच्याकडून कर्नाटक संगीताचं शिक्षण घेतलं. जिद्दीनं वडिलांपेक्षा वेगळी गायकी पेश करण्याचा ध्यास बाळगणार्‍या मुकुल यांनी आपलं नाव तर बदललंच पण आपला स्वतंत्र मार्ग शोधण्यासाठी ते घरातूनही बाहेर पडले. संस्कृतमध्ये केलेल्या संगीत रचना ही मुकुल शिवपुत्र यांची भारतीय शास्त्रीय संगीताला दिलेली देणगी आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 8, 2009 02:26 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2009 02:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close